पिंपरी : संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी सर्पोद्यानातील बंदिस्त मोराला मुक्त करण्यासाठी अधिकार्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. वनविभागाची परवानगी घेऊन त्याला भुजबळवस्तीतील हिरव्यागार गायरानात सोडण्यात येईल. त्यासाठी तीन-चार दिवसांचा कालावधी लागले, अशी माहिती सर्पाेद्यानाचे संचालक अनिल खैरे यांनी रविवारी लोकमतला दिली.
हिंजवडीतील त्या लांडोराचे रुदन ऐकू येईल का? अशा आशयाचे वृत्त लोकमतने रविवारी प्रसिद्ध केले. आठवडाभरापासून मोर नजरेआड झाल्याने लांडोर आणि तिच्या पिलांची झालेली विषण्णावस्था त्यातून मांडण्यात आली. त्यांचे कण्हणे, टाहो फोडणे मन हेलावून टाकणारे असल्याचा अनुभव लोकमत प्रतिनिधींनी स्वत: शनिवारी सकाळी भुजबळ वस्तीमधील गायरानात जाऊन घेतला. कुत्र्यांच्या उपद्रवापासून पिलांना दूर ठेवण्यासाठी लांडोराची सुरू असलेली तडफड, जिव वाचविण्यासाठीची त्यांची धडपड आणि विरहामुळे त्यांची झालेली अवस्था वृत्तातून मांडण्यात आली. ती मनाला भिडल्याचे अनेक वाचकांनी लोकमत कार्यालयात तसेच लोकमत प्रतिनिधींना दूरध्वनी करून कळविले. हृदयस्पश्री आणि पशु पक्ष्यांबद्दलची संवेदना जागविणारे हे वृत्त असून त्यांच्या विरहाबद्दलची हळहळही व्यक्त केली. विशेष म्हणजे नागपंचमीनिमित्त सर्पोद्यानात आज गर्दी होती. तेथे आलेल्या महिला, अन्य नागरिकांना पिंजर्यातील तो बंदिस्त मोर पाहण्याची उत्सुकता होती. त्यांनी आवर्जुन त्याला पाहिले. त्याची तेथून लवकर मुक्तता व्हावी अशा सदिच्छाही एकमेकांजवळ
व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)
मोराची मुक्तता करण्यासाठी आम्हाला वनविभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. सलग तीन दिवस सुट्या आल्याने परवानगी घेण्यास विलंब झाला, त्यामुळे मोराला पिंजर्यात ठेवावे लागले. सोमवारी वनविभागाकडे परवानगी मागण्यात येईल. ती मिळताच त्याला भुजबळ वस्तीमधील गायरानात सोडण्यात येईल, त्यासाठी तीन-चार दिवसांचा कालावधी लागेल.
- अनिल खैरे,
संचालक, निसर्गकवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान

No comments:
Post a Comment