पिंपरी : चैन स्नॅचिंग आणि तत्सम जबरी चोर्या रोखणे पोलिसांपुढे आव्हान ठरत आहे. अशा घटनांना आळा बसण्याकरिता जनजागृती आवश्यक असून, त्यासाठी चिंचवडमधील काही जागरूक नागरिकांनी पावले उचलली आहेत. मोटारीत ध्वनिक्षेपक लावून त्याद्वारे परिसरात जनजागृतीचे काम त्यांनी हाती घेतले आहे.
चिंचवडमधील संस्कार प्रतिष्ठान आणि निगडी पोलीस ठाणे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. त्याचे उद्घाटन बुधवारी (दि. २१) झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर भोसले पाटील, निरीक्षक पी. एन. सुपेकर, सहायक निरीक्षक मारुती मोहिते आदी या वेळी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment