पिंपरी : पवना धरण परिसरात आणि मावळ पश्चिम पट्टय़ात ढगफुटी झाली. मेघगर्जनेसह झालेल्या अतवृष्टीमुळे पवना नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. रात्री पावणेबाराच्या सुमारास पिंपरी-चिंचवडमधील नदीकाठच्या भागात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीत तातडीच्या दक्षतेच्या उपाययोजनांसाठी महापालिकेची यंत्रणा कामी आली. परंतु जबाबदार वरिष्ठ अधिकारी निवांत राहिले, तर कनिष्ठ कर्मचार्यांनीच ही परिस्थिती हाताळली. त्यांच्यावर कामाचा ताण आला. ब प्रभागातील महत्त्वाच्या अधिकार्यांचे मोबाईल दुसर्या दिवशी सायंकाळपर्यंत ‘नॉट रिचेबल’ होते.
No comments:
Post a Comment