Tuesday, 15 October 2013

पिंपरी महापालिकेचा शहर स्वच्छता आराखडा तयार

शहरात पुरेशी स्वच्छतागृहे उभारण्यासाठी महापालिकेने शहर स्वच्छता आराखडा (सिटी सॅनिटेशन प्लॅन) तयार केला आहे. त्याअंतर्गत विविध भागांत पुरुष व महिलांसाठी रहिवासी क्षेत्र, झोपडपट्टी आणि वर्दळीच्या ठिकाणी (तरंगती लोकसंख्या) स्वतंत्ररित्या सुमारे 2200 स्वच्छतागृहे दीड वर्षात उभारण्यात येणार आहेत. मात्र, त्यासाठी मार्च 2015 उजाडणार आहे.

No comments:

Post a Comment