पिंपरी : नवरात्रोत्सवातील देवीच्या मंदिरांवरील रोषणाई, मंदिरातील सजावट पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. तसेच रासगरबा, दांडिया रंग भरू लागला आहे.
नेहरूनगर परिसरातील मंडळांनी नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या मूर्तींची स्थापना केली असून आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई केली आहे. जय संतोषी माता मंदिरावर रोषणाई केली आहे. त्रिलोक धाम प्रतिष्ठानच्या वतीने वर्गणी न मागता देवीच्या मूर्तीची घटस्थापना केली असून, सजावट केली आहे. मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही देखाव्याची परंपरा जपली आहे. मंडळाच्या वतीने ‘संत तुकारामाचा भक्तीचा मेळा’ हा पौराणिक देखावा सादर केला आहे. देखावा पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करीत आहेत.

No comments:
Post a Comment