पिंपरी : चिखली येथे २५.३ हेक्टर प्रशस्त जागेवर ६ हजार ७२0 सदनिकांचा मध्यमवर्गीयासांठी घरकुल प्रकल्प उभारण्यात येत आहे. राज्य सरकारने या विशेष प्रस्तावासाठी अडिच एफएसआय देऊ केला. मात्र, प्राधिकरणाने एफएसआयबाबत बांधकाम नियंत्रण नियमावलीत फेरबदल केले नाही, त्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ३७ (१) ची कार्यवाही करून चूक सावरण्याचा प्रयत्न प्राधिकरण आणि महापालिकेतर्फे सुरू आहे. प्राधिकरणात बुधवारी २0 नोव्हेंबरला होणार्या हरकतींच्या सुनावणीत या प्रकरणी जोरदार आक्षेप नोंदवला जाणार आहे.
No comments:
Post a Comment