Thursday, 19 December 2013

संगणकीय चुकांमुळे गोंधळ

पिंपरी : महापालिकेने ‘घरकुल’ प्रकल्पातील १२ इमारती आणि ५0४ लाभार्थींची संगणकीय सोडत काढली. संगणकीय प्रणालीत सात मजल्याच्या इमारतींऐवजी सहा मजल्याच्या इमारती अशी माहिती दिली असल्याने सोडतीत गडबड झाली. कार्यक्रमावेळी काढण्यात आलेल्या सुरुवातीच्या चार सोडत चुकीच्या निघाल्या. वेळीच चूक लक्षात आल्यानंतर पुन्हा सोडत काढण्यात आली. 
महापालिकेने उभारलेल्या इमारती सात मजल्यांच्या आहेत. एका मजल्यावर ६ सदनिका यानुसार पात्र लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन संगणकीय प्रणालीद्वारे सोडत काढली. प्रत्यक्षात इमारती सात मजल्याच्या परंतु संगणकीय प्रणालीत सहा मजल्याच्या अशी नोंद असल्याने चुकीच्या पद्धतीने सोडत निघाली. वेळीच ही चूक लक्षात घेऊन महापालिका संगणकीय प्रणालीत बदल केले. फेरसोडत काढली. कार्यक्रमास महापौर मोहिनी लांडे, उपमहापौर राजू मिसाळ, ब प्रभाग अध्यक्षा यमुना पवार, आशा सुपे, साधना जाधव, अनंत कोर्‍हाळे, दिलीप गावडे, रामदास तांबे, निळकंठ पोमण आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment