पिंपरी : पिंपरी कॅम्पातील भाजी मंडईत टोमॅटोची आवक वाढल्याने टोमॅटोचे दर प्रती किलोमागे पाच ते दहा रुपयांनी घटले. आवक घटल्याने राजमा, मिरची महागली. तर लग्नसराईमुळे गुलछडी, गजरा, गुलाब या फुलांच्या किंमतीत मोठी वाढ झाली.
पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्ड व ग्रामीण भागातून टोमॅटोची आवक वाढली. यामुळे टोमॅटो ३0 रुपयांवरून २0 रुपये प्रती किलोवर आला. आवक घटल्याने राजमा, आले, मिरची यांच्या दरात पाच ते दहा रुपयांपर्यंत वाढ झाली. कांदा, बटाटा, कारले, गाजर वांगी, गवार यांचे भाव स्थिर राहिले. तर फ्लॉवर, भेंडी, लसूण यांचे भाव घसरले आहेत.

No comments:
Post a Comment