पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची संभाव्य बदली रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवायचे आणि टप्प्याटप्प्याने ते तीव्र करायचे, असा निर्णय बुधवारी शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. आयुक्तांना पाठिंब्यासाठी उद्यापासून शहरातील चौकाचौकांत सह्यांची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उद्या शहरात असून त्यांनीही या मोहिमेत सहभागी व्हावे, असा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment