लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेने शहरातील रस्त्या-रस्त्यावर लागलेल्या अनधिकृत फलकांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. चालु महिन्यात महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील सुमारे 11 हजार 166 फलकांवर कारवाई केली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी आज (शनिवारी) दिली.
महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने 1 ते 14 मार्च या कालावधीत बेकायदेशीर फ्लेक्सबाजी हटविण्याची मोहीम हाती घेतली. त्यामध्ये शहरातील सर्व भागात कारवाई करण्यात आली असून सुमारे 11 हजार 166 फलकांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.
No comments:
Post a Comment