Monday, 10 March 2014

संगीत, नृत्य अभिनयातून मांडली स्त्रीजीवनाची गाथा

रहाटणी येथील यशःसुख सोशल फौंडेशन संचलित "निर्भया"महिला मंचच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या "निर्भया" महिला महोत्सवाच्या तिस-या दिवशी अमोल मोरे दिग्दर्शित नृत्य संगीत अभिनयातून कलाकारांनी स्त्रीजीवनाची गाथा मांडली.
या संगीतमय नाटिकेमध्ये सुरुवातीला राणी लक्ष्मीबाई, जिजाबाई, इंदिरा गांधी, सरोजिनी नायडू, कल्पना चावला, पत्रकार बरखा दत्त यांसारख्या क्रांतीकारी स्त्रियांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी चित्रफित दाखविली. बालविवाहमुळे मुलींच्या आयुष्याची झालेली राखरांगोळी एका प्रयोगातून साकार केली. कौटुंबिक हिंसाचार, स्त्रीभ्रुण हत्या यावरील लघुनाटिकाही सादर केली. मागील वर्षी दिल्लीमध्ये घडलेली सामूहिक बलात्काराची घटनेचे नाट्यरुपांतर कलाकारांनी प्रेक्षकांसमोर मांडले.

No comments:

Post a Comment