Wednesday, 5 March 2014

शहरात 'नमो फॉर पीएम' अभियान

भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने 'नमो फॉर पीएम' हे अभियानसंपूर्ण देशभर राबविले जात आहे. या अभियानाची सुरूवात रावेत येथील डॉ.डी.वाय.पाटील इंजिनिअरींग कॉलेजपासून करण्यात आली.
या अभियानाच्या निमीत्ताने 'नमो व्हीजन फॉर ड्रीम इंडिया' हा दूरदुष्टीचा आराखडा असलेले व्हीजन डॉक्युमेंट महाविद्यालयीन युवकांसमोर मांडले जाणार आहे. ज्ञान, परंपरा, पर्यटन, व्यापार आणि तंत्रज्ञान यांच्या पंचसुत्री कार्यक्रमाने विकास कसा साधता येईल, याचे मार्गदर्शन आणि जनजागृती यावेळी केली जाणार आहे.  भारत हा ब्रँड म्हणून विकसित करण्यासाठी 'नमो स्वयंसेवकांची निर्मीतीची' करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. या अभियानाचे उद्‌घाटन भाजप पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मोरेश्वर शेडगे, कार्याध्यक्ष माऊली थोरात, सरचिटणीस राज दुर्गे, अमोल थोरात, गणेश वाळुंजकर तसेच महाविद्यालयाचे नमो सदिच्छादूत निखील कुटे, भाजपायुमोचे स्वप्नील देव, ज्ञानेश्वर मुंडे, सचिन अहिरराव, तन्मय देशपांडे, आदित्य ढवळेकर, शंतनु करंबळेकर, संकेत देशपांडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक निखील कुंटे यांनी केले. नवनाथ तरस यांनी सूत्रसंचालन केले. विशाल वाळुंजकर यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निखिल कुटे, अमित पवार, अक्षय पाटील, गणेश सांगळे, तुषार शिंदे, अर्जुन धस, प्रणित कणसे यांनी उत्स्फुर्तपणे परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment