गेली कित्येक महिने अडकलेला ताथवडे विकास आराखडा मंजुरीचा ब्रेक अखेर निघाला. महापौर मोहिनी लांडे यांनी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी 1 दिवस अगोदर म्हणजे 4 मार्च रोजी सभावृत्तांतावर स्वाक्षरी केली. स्वाक्षरीअभावी 50 दिवसाहून अधिक काळ रखडलेला ताथवडे विकास आराखडा आता राज्य सरकारकडे पाठविण्याचा मार्ग मोकळा झाला. नियोजन समिती सदस्यांसह महासभेने सुचविलेल्या 15 उपसूचना संमत झाल्या असल्या तरी राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे ताथवडेवासियांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment