तळवडे : रुपीनगर परिसरातील पश्चिमेच्या बाजूस लागून असलेल्या देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत बेकायदेशीरपणे टाकण्यात येत असलेल्या कचर्यामुळे रुपीनगर-वासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
रुपीनगरच्या पश्चिमेस लागून देहूरोड कॅन्टोन्मेंटची हजारो एकर जमीन आहे. या जमिनीला संरक्षक भिंत नाही, त्यामुळे बाहेरील नागरिकांच्या या ठिकाणी राजरोसपणे वावर आहे. गेल्या काही वर्षांपासून येथील जागेत एका खासगी एजन्सीद्वारे देहूरोड कॅन्टोन्मेंटचा कचरा आणून टाकण्यात येत आहे. याशिवाय दुसर्या एका ठेकेदाराद्वारे हॉटेलमधील टाकाऊ अन्न टाकण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment