पिंपरी : दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळी सुटीच्या प्रारंभीच महापालिकेच्या तरण तलावात एकाचा बुडून मृत्यू झाला. पोहायला शिकणार्यांची अमाप गर्दी आणि बेफिकीर जीवरक्षक ही यामागील प्रमुख कारणे आहेत. पण, महापालिका बदलाला तयार नाही. ही यातील शोकांतिका आहे. एका बॅचमध्ये किती जणांना प्रवेश द्यावा. नवोदितांनी किती खोल उतरावे, हुल्लडबाजांना कसे रोखावे, दुघर्टना घडू नये यासाठी कर्मचार्यांनी किती दक्ष राहावे, आणि घटना घडलीच तर हवी असणारी उपचार यंत्रणा तत्काळ कशी उपलब्ध होईल.. याविषयीचे नियम बासनात ठेवल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसले.
No comments:
Post a Comment