Tuesday, 27 May 2014

बहिणाबाई प्राणीसंग्रहालयासाठी आणखी एका सल्लागाराचा घाट

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सल्लागारांवर उधळपट्टी सुरुच आहे. संभाजीनगर येथील निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयाच्या बृहत आराखड्याच्या पाठपुराव्यासाठी यापूर्वीच एका सल्लागाराची नेमणूक करण्यात आली असताना आता नियोजन व विकासाच्या कामकाजाच्या नावाखाली आणखी एक सल्लागार नेमण्याचा घाट घालण्यात आला आहे. 
महापालिकेच्या वतीने पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. हा आराखडा तयार करण्याचे काम पी. के. दास असोसिएटस् अँड कंपनी यांना देण्यात आले आहे. याअंतर्गत महापालिकेच्या संभाजीनगर येथील निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी उद्यानाच्या बृहत विकास आराखडा तयार करण्यासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे पाठपुरावा करणे तसेच वास्तुविशारद सल्लागार म्हणून पी. के. दास असोसिएटस् यांची नियुक्ती करण्याचा निर्णय महापालिकेने यापूर्वीच घेतला आहे. 

No comments:

Post a Comment