वाढत्या उकाड्यामुळे शहरवासीय हैराण झाले असताना पशूपक्ष्यांनाही उन्हाच्या झळा सोसवत नाहीत. पशू-पक्षी उष्माघाताने दगाविण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या पशूवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी येणा-या पशू-पक्ष्यांमध्ये उष्माघाताने आजारी असलेल्या प्राण्यांचे प्रमाण 40 टक्के आहे. मागील अनेक वर्षातील यावेळचे प्रमाण सर्वाधिक असून आता मे महिना सुरु झाल्याने पशू-पक्ष्यांची अधिकाधिक काळजी घेणे गरजेचे असल्याची माहिती महापालिकेचे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांनी 'एमपीसी न्यूज'शी बोलताना दिली.
No comments:
Post a Comment