निनावी तक्रारअर्जामुळे जात पंचायतीचे रहस्य उलगडले
झपाट्याने विकसित होणा-या आणि सुशिक्षितांचा गोतावळा असलेल्या शहरात आजही जात पंचायत अस्तित्वात आहे. समाजातील लोकांना पंचायतीच्या परंपरेनुसार बांधून ठेवण्याचा प्रयत्न ती करते. एखाद्यावर अन्याय होत असेल, तरी जात पंचायतीला त्याची पर्वा नाही. हडपसर पोलिसांकडे आलेल्या निनावी तक्रारअर्जामुळे पिंपळे-गुरवमधील वैदु समाजाच्या जात पंचायतीचा एक प्रकार पुढे आला. पंचायतीच्या परंपरेविरुध्द तिस-याच पोटजातील मुलीशी विवाह जुळवल्याने हा विवाह पंचायतीला मान्य नव्हता. मात्र, या विवाहाला आमचा विरोध नसून यापुढे असे विवाह होणार नाही, अशी भुमिका या पंचायतीने मांडली आहे.
No comments:
Post a Comment