थेरगावमधील एका शेतक-याचा मुलगा, सलग तीन वर्षे नगरसेवक, महापालिकेतील विरोधी पक्षनेता आणि त्यानंतर थेट मावळ लोकसभा मतदार संघातील खासदार असा श्रीरंग बारणे यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
चंदू बारणे हे एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी. श्रीरंग बारणे हे त्यांचे धाकटे चिरंजीव. श्रीरंग बारणे यांनी एफवायबीकॉम पर्यंतचे शिक्षण घेतले. दरम्यानच्या काळात ते कोल्हापूर येथे पहिलवानकीसाठी गेले. मात्र, व्यवसाय करण्याच्या आवडीमुळे तेथे ते फार काळ रमू शकले नाही. त्यानंतर त्यांनी त्यांचे बंधु हिरामण बारणे यांच्या वीट व्यवसायाला हातभार लावण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी हिरामण बारणे हे थेरगावचे उपसरपंच होते.
No comments:
Post a Comment