महापालिकेने जलतरण तलावांच्या तिकीट दरात केलेली अवाजवी दरवाढ रद्द करावी, अशी मागणी शिक्षण मंडळ सदस्य श्याम आगरवाल यांनी केली आहे.
यासंदर्भात आगरवाल यांनी महापालिका आयुक्त राजीव जाधव यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या जलतरण तलावांसाठी 14 एप्रिलपासून तिकीट दरामध्ये वाढ केली आहे. नवीन दरवाढीनुसार जलतरण तलावाचे तिकीट दर दुप्पट केले आहेत. तर पासच्या किमतींमध्ये तिप्पट ते पाचपट वाढ करण्यात आली आहे. एका बॅचच्या तिकीट दरात दुप्पट वाढ करीत ते 20 रुपये, त्रैमासिक पाससाठी दीड हजार रुपये भरावे लागणार आहेत. 6 महिन्यांसाठी अडीच हजार, तर वार्षिक पाससाठी तब्बल साडेचार हजार रुपये जमा करावे लागतील. अपंग, राष्ट्रीय खेळाडू, ज्येष्ठ नागरिक व पत्रकारांना सवलतीमध्ये वार्षिक पास 3 हजार 200 रुपये इतका केला आहे. पूर्वी तो 500 रुपये इतका अल्प होता.
No comments:
Post a Comment