बीआरटीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. बीआरटीच्या प्रकल्पामुळे रस्ता छोटा झाला असून नागरिकांना वाहतूक कोंडीच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. सर्व्हिस रस्ता हा 50 टक्के कमी झाला असून वाहतूक मात्र तेवढ्याच प्रमाणात असल्याने वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. बीआरटीमुळे वाहतूक कोंडी कमी होईल असा अंदाज होता. परंतू सध्याच्या बीआरटीच्या कामामुळेच वाहतूक कोंडीची समस्या दिसून येत आहे. रस्त्यालगत 'नो पार्किंग' असताना देखील नागरिक रस्त्यालगत वाहने पार्क करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे.
No comments:
Post a Comment