वेळेवर जमा होणार प्रतिनियुक्तीवरील अधिका-यांची अंशदान रक्कम
प्रतिनियुक्तीवरील अधिका-यांच्या रजा वेतन व निवृत्ती वेतनापोटी देण्यात येणारी अंशदान रक्कम दर वर्षी प्रत्येक वित्तीय वर्ष संपल्यापासून 15 दिवसाच्या आत अथवा प्रतिनियुक्तीवरील अधिका-यांची बदली वित्तीय वर्ष संपण्यापूर्वी समाप्त झाल्यास कार्यमुक्त होताना भरावी, असे आदेश महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी दिले आहेत. वेळेत रक्कम जमा न केल्यास थकीत अंशदानाच्या रकमेवरील व्याज संबंधित विभागाच्या लिपीकाच्या वेतनातून वसुल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment