'एमएसआरडीसी'चा प्रताप कोट्यवधींचा घोटाळा
'कायद्याचे बोला' हा सिनेमा तुम्ही पाहिलाय. त्या सिनेमात केवळ कागदपत्रांच्या आधारे विहीर खोदल्याचे सांगून अनुदान लाटणा-या शासकीय यंत्रणेवर झणझणीत अंजन घातले आहे. या सिनेमासारखेच प्रत्यक्षात घडले आहे. शिळफाटा ते निगडी या रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याचे दाखवून 2006 पासून बेकायदेशीरपणे टोल वसुली सुरु आहे. प्रत्यक्षात देहूरोडपासून निगडीपर्यंत हा चौपदरी रस्ताच अस्तित्वात नाही. हे कमी पडते म्हणून की काय याच रस्त्यांतर्गत येणा-या देहूरोड ते निगडी रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी सुमारे 41 कोटी खर्चाला एमएसआरडीसीने केंद्राच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाची मंजुरी मिळविली आहे.
No comments:
Post a Comment