महापालिकेच्या सर्व रुग्णालये व दवाखान्यांमध्ये राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत केसपेपर देण्याचा निर्णय आज (मंगळवारी) स्थायी समिती सभेत घेण्यात आला.
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात पार पडलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महेश लांडगे होते. या सभेत महापालिका परिसरातील विविध विकासकामांसाठी सुमारे 70 लाखांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत केसपेपर देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तर वैद्यकीय उपचार योजनेअंतर्गत पिवळे व केशरी रेशनकार्डधारक नागरिकांकडूनही केसपेपरसाठी शुल्क आकारले जाणार नाही.
No comments:
Post a Comment