थेरगावमधील संघर्ष बालग्राम अनाथ आश्रमातील तेरा वर्षीय मुलीवर संस्था चालकाने लैगिक अत्याचार केल्याचा गुरूवारी (दि.5) उघडकीस आला होता. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संस्थाचालकाला न्यायालयाने बारा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संघर्ष बालग्राम हे विनापरवाना असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या बालग्रामची धर्मदाय आयुक्तांकडे नोंद आहे. परंतू जिल्हा महिला बालविकास आयुक्तालय मुंबईची परवानगी नसल्याने हे बालग्राम विनापरवाना असल्याचे पोलीस निरिक्षक ए.टी वाघमळे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment