पिंपरी महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी उद्यान विभागातील अधिकारी व संबंधित ठेकेदारांना चांगलेच फटकारले. 'बारामती कनेक्शन' असलेला अधिकारी व ठेकेदारीत मक्तेदारी असलेल्या एका ठेकेदाराला उद्देशून, सतत 'बारामती'चे नाव घेऊन मनमानी करू नका, काम चांगले नसल्यास गय करणार नाही, असा सज्जड दम आयुक्तांनी त्यांना भरला.
शहरातील १०० हून अधिक उद्याने तसेच मोठय़ा रस्त्यांच्या सुशोभीकरणाची कामे एकाच ठेकेदाराकडे आहेत, तो बारामतीचा आहे. या विभागातील निर्णयाधिकारी देखील बारामतीकडील आहे. या दोघांचे 'साटेलोटे' असल्याचे उघड गुपित आहे. 'मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर' अशी त्यांची नेहमीची कार्यपध्दती आहे. त्यांच्या कामाविषयी सतत तक्रारी होत असतात. या चुकांचे खापर आयुक्तांवर फुटू लागल्याने त्या दोघांसह आयुक्तांनी सर्वाचीच खरडपट्टी काढली.

No comments:
Post a Comment