जुन्नरः पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प जलदगतीने मार्गी लावण्यात यावा, अशी आग्रही मागणी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होऊन त्यांनी पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाची व्यवहार्यता लक्षात आणून दिली. या वेळी ते म्हणाले, 'पुणे-नाशिक रेल्वेप्रकल्प २४५ किलोमीटर असून, या मार्गाचे २०१२मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. या प्रकल्पाची किंमत १९०० कोटी रुपये आहे. व्यावहारिक दृष्टीने हा प्रकल्प फायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्यावर केंद्र आणि राज्य सरकारने आवश्यक खर्चाचा निम्मा वाटा उचलावा असे केंद्रीय रेल्वे बोर्डाने सुचविले होते. त्यानुसार खर्च उचलण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे.'
No comments:
Post a Comment