Tuesday, 7 April 2015

स्वस्तातील औषधे १५ ठिकाणी उपलब्ध

डायबेटीस, हृदयरोगासारख्या महत्त्वाच्या विकारांवरील स्वस्तातील औषधे सध्या शहरात सहकारनगर, धनकवडी, कोथरूड, सिंहगड रोड, हडपसर आदी १५ ठिकाणी उपलब्ध आहेत. आठवडाभरात शंभर ठिकाणी ही औषधे उपलब्ध केली जाणार आहेत. 

'ग्राहकांची सोय व्हावी म्हणून आठवडाभरात शहरातील आणखी काही ठिकाणी औषधे उपलब्ध होतील. एकूण १०० दुकानांत औषधे उपलब्ध करण्यात येतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पिंपरीसह जिल्ह्यात औषधे उपलब्ध केली जातील,' असेही चंगेडिया यांनी स्पष्ट केले. औषध उपलब्ध होण्यासंदर्भात तक्रार अथवा अडचण असल्यास अधिक माहितीसाठी ९८२२०८९५८९ यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment