पिंपरी-चिंचवड शहराला "स्मार्ट सिटी‘ योजनेतून डावलले नव्हे, तर बाहेर काढले. शहराच्या भवितव्याच्या दृष्टीने हे दुर्दैवी म्हणावे लागेल. काय राजकारण शिजले हे अद्याप समोर आलेले नाही. योजनेसाठी सर्व निकष पूर्ण केले, आवश्यकतेपेक्षा चांगले गुण (92 टक्के) मिळाले असतानाही डावलल्याची खंत वाटते. शहरातील शिवसेनेच्या खासदारांनी भरपूर प्रयत्न केले. त्यांचा शब्द चालला नाही. भाजपचे खासदार अमर साबळे यांचे वजन नसल्याचे दिसले. खरे तर राज्य सरकारने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचा स्वतंत्र प्रस्ताव पाठविणे अपेक्षित होते. तो संयुक्त पाठविला तिथेच माशी शिंकली. मुळात तीच एक राजकीय खेळी होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण कोणत्या शहराची निवड करायची हा सर्वस्वी राज्य सरकारचा अधिकार होता. भाजपने केवळ राजकीय हेतूनेच राष्ट्रवादीचा "गेम‘ केला. आगामी काळात कदाचित त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसची आणि विशेषतः अजित पवार यांच्या अखत्यारीतील महापालिका म्हणून डाव केला असेल तर खूप वाईट आहे. अन्यायकारक आहे. पिंपरी-चिंचवडकरांचा हा घोर अपमान आहे.
Sakal News
Sakal News
No comments:
Post a Comment