एमपीसी न्यूज - 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेने प्रेक्षकांवर अक्षरश: गारुड घातले. सहा त-हेचे सहा मित्र एकत्र एकाच घरात राहतात, अशा वेगळ्याच संकल्पनेने मालिकेमध्ये आणखीनच रंगत आणली. याच मालिकेतील आशूची भूमिका लहानांपासून मोठ्यांनादेखील भावली. सगळ्य़ांना त्रास देणारा, खादाड पण तितकाच भावूक आणि प्रेमळ असा ‘आशू’ लहानांच्या गळ्यातील ताईत झालाय. आशूची भूमिका करणारा पिंपरी- चिंचवडकर असणारा पुष्कराज चिरपुटकर. पिंपरी-चिंचवड व्हाया पुणे ते मुंबई हा प्रवास नक्कीच रंजक होता असं पुष्कराज म्हणतो. या मालिकेने पुष्कराजच्या अभिनयाच्या करिअरला उत्तम ब्रेक मिळाला, याबाबत त्याच्याशी केलेली दिलखुलास चर्चा.
No comments:
Post a Comment