Wednesday, 28 September 2016

अमृत, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर बॅकबोन ओरॅकल कंपनीशी सामंजस्य करार... पिंपरी-चिंचवड शहराला हे तीन प्रकल्प 'तारणार' का?

स्मार्ट सिटीमधून (राज्य शासनाच्या चुकीने) बाहेर पडल्यानंतर शहराकडे तीन नवीन प्रकल्प आले ज्यातूनच राज्य/केंद्र सरकारचा निधी मिळणे शक्य होणार आहे. आम्ही PCCF, Connecting NGO या सर्व संस्थांनी स्मार्ट सिटी समावेशाचा आग्रह सोडला का? तर नाही! आम्ही समावेश होणार यासाठी अजूनही आशावादी आहोत कारण 100 पैकी 97 नावेच फायनल झाली आहे (इथे वाचा https://goo.gl/Wqf19w) महाराष्ट्राचे केंद्रात वजन असेल आणि स्थानिक नेत्यांचे राज्यात वजन असेल तर राहिलेल्या तीनमध्ये शहर अजूनही निवडले जाऊ शकते. महानगरपालिका निवडणूका जवळ आल्या आहेत तेव्हा श्रेयवादाच्या फेऱ्यात अडकलेल्या या शहराला न्याय मिळेल अशी अशा वाटते. सध्या तिसऱ्या यादीत शहराचे नाव का नाही यावर निरर्थक वाद/राजकारण चालू आहे. केंद्राने प्रसिद्ध केलेल्या अंतिम यादीत पिंपरी-चिंचवडचा समावेश नव्हता त्यामुळे दुसऱ्या/तिसऱ्या यादीत समावेशाचा प्रश्नच येत नाही. आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार...

No comments:

Post a Comment