संपूर्ण देशात, 500 शहरांमध्ये दिनांक 4 जानेवारीपासून
"स्वच्छ सर्वेक्षण 2017" अभियानाला सुरवात झाली आहे. केंद्रीय टीमची प्रत्यक्ष पाहणी, पालिकेची आकडेवारी, स्वच्छता ऍपद्वारे तक्रार निवारण व नागरिकांचा अभिप्राय या निकषांवर शहरांना गुणांकन दिले जाईल व त्याआधारे स्वच्छ शहरे निवडली जाणार आहेत. नागरिकांचा अभिप्राय याला एकूण गुणांकनामध्ये 30% वजन आहे, तेव्हा आपले शहर स्वच्छतेबाबतीत नक्की कुठे आहे हे कळण्यासाठी 4
ते 15 जानेवारी या कालावधीत जास्तीतजास्त नागरिकांनी सर्वेक्षणात सहभागी झाले पाहिजे.
सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी खालील पर्याय
1. टोल-फ्री नंबर
1926 वर मिस्ड कॉल द्या त्यानंतर येणा-या कॉलवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
2. नेटिझन्ससाठी गुगल फॉर्म हा पर्याय आहे. लिंक https://goo.gl/q4UEek
No comments:
Post a Comment