पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) घोटाळा झाल्याचा आरोप सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी केला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत पराभूत उमेदवार आहेत. महापालिकेची बॅलेट पेपरद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे. पिंपरी येथील लोखंडे भवनात सर्वपक्षीय नेत्यांची सभा झाली. यावेळी मावळत्या महापौर शकुंतला धराडे, माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, नाना काटे, प्रशांत शितोळे, मारुती भापकर, भगवान वाल्हेकर यांच्यासह अन्य उमेदवार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment