एमपीसी न्यूज- महापालिका निवडणुकांची लगबग संपताच महापालिका प्रशासनाने स्मार्ट सिटी कार्यवाहीला सुरुवात केली असून महापालिकेच्या विभागानुसार त्यांच्याशी संबधित नागरिकांच्या बैठका घेऊन स्मार्ट सिटीसाठी सूचना घेतल्या जात आहेत. महापालिकेचे स्थापत्य, नगररचना, वैद्यकीय, नागरी सुविधा केंद्र, भूमी जिंदगी, बांधकाम परवाना, मिळकत कर, एलबीटी या सारखे विविध विभागाद्वारे नागरिक व त्या क्षेत्रातील व्यक्तींशी विभाग प्रमुखांना बैठका घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे बैठका सुरू असून शहरात स्मार्ट सिटीवर नागरिकांचा सल्ला घेण्याचे काम चालले आहे.
No comments:
Post a Comment