Monday, 10 April 2017

आयुक्तांच्या बदलीची पालिका वर्तुळात चर्चा

पिंपरी - महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची बदली होणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. राज्य सरकारने मात्र, याबाबत अद्याप अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. 
महापालिकेत गतिमान आणि पारदर्शक कारभारासाठी तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांचे नाव घेतले जाते. धडाडीने निर्णय घेऊन त्यांनी प्रशासनाला एक वेगळीच शिस्त लावली होती. "पीएमपी'चा कारभार सध्या शिस्तप्रिय तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपविला आहे. त्यांनी पीएमपीची विस्कटलेली घडी सावरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महापालिकेत सध्या सत्तेत असलेल्या भाजपने पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार हा आपला "अजेंडा' चालविला आहे. त्यासाठी परदेशी, मुंढे यांच्यासारखा धडाडीने निर्णय घेऊन महापालिकेला आर्थिक शिस्त लावणारा अधिकारी आयुक्त म्हणून भाजपला हवा आहे. सध्याचे आयुक्त दिनेश वाघमारे हे स्वतः बदलीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी बदली होऊन येणारा अधिकारी हा धडाकेबाज निर्णय घेणारा असावा, अशी अपेक्षा राजकीय गोटातून वर्तविली जात आहे. 
माझे कुटुंबीय मुंबईला असल्याने मी बदलीची मागणी केली आहे. तथापि, अद्याप राज्य सरकारकडून मला त्याबाबत अधिकृत निर्णय कळविलेला नाही. 
- दिनेश वाघमारे, आयुक्त 

No comments:

Post a Comment