बेल्हे, दि. 30 (वार्ताहर)-गेल्या पंधरा दिवसांपासून पिपरी-चिंचवड आरटीओच्या खासगी वाहन विभागात ग्राहकांची कामेच होत नाहीत. या आरटीओत कामाचा पूर्णपणे बोजवारा वाजल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पिपरी-चिंचवड आरटीआतील मनमानी कारभारामुळे वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून त्याचा त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. पिंपरी-चिंचवड आरटीओत माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना शासन आदेशा प्रमाणे स्पीड गव्हर्नर (वेग वहातुक नियंत्रक) वाहन पासिंग करतांना सक्तीचे करण्यात आले, मात्र याबाबत अंमलबजावणी करताना पिंपरी चिंचवड व पुणे तसेच बारामती या कार्यालयात वेगवेगळे निकष लावून अंमलबजावणी होत असल्याने वाहनधारकांमध्ये सभ्रम निर्माण होत आहे.

No comments:
Post a Comment