आर्थिक गाडा रुळावर येण्याची शक्यता : डेपो मॅंनेजरकडे असणार कंट्रोल
पुणे – गेल्या काही वर्षांपासून आर्थिक भार सोसत अडखळणाऱ्या पीएमपी प्रशासनाने आता “हायटेक’ च्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला आर्थिक गोलमाल थांबविण्यासाठी प्रत्येक बसेसना “जीपीएस’ यंत्रणा बसविण्याचा महत्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे, ही यंत्रणा वाहकाच्या ई-तिकिटिंग मशीनमध्ये बसविण्यात येणार आहे. त्यामुळे तिकिटाचे पैसे खाण्यात माहीर असणाऱ्या वाहकांनाही प्रमाणात लगाम बसणार आहे. त्यासाठी प्रत्येक डेपोमध्ये कंट्रोल रूम सुरू करण्यात येणार आहे. त्याचे कंट्रोल संबधित डेपो मॅंनेजरकडे असणार आहे.
No comments:
Post a Comment