सफाई कामगारांच्या “पीएफ’वर डल्ला
पिंपरी, (प्रतिनिधी) – शहरातील रस्ते आणि गटारांची दैनंदिन साफसफाईचे ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या बेरोजगार व स्वयंरोजगार संस्थांना पिंपरी-चिंचवड महापालिकेने दणका दिला आहे. कामगारांच्या भविष्य निर्वाहाची (पीएफ) रक्कम न भरणाऱ्या तीन संस्थांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. त्यामध्ये “अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत काम करणाऱ्या दोन आणि “इ’ क्षेत्रीय कार्यालयात काम करणाऱ्या एका संस्थेचा समावेश आहे. कामगारांच्या “पीएफ’ची रक्कम भरल्याचे सात दिवसात पुरावे न दिल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा या तीनही संस्थांना इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कामगारांची “पीएफ’ रक्कम हडपणाऱ्या संस्थांचे धाबे दणाणले आहेत.

No comments:
Post a Comment