पुणे - आधार कार्डमधील नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आदी बदल यापुढे टपाल कार्यालयात करून मिळणार आहेत. त्यासाठी सर्व टपाल कार्यालयांत आधार अद्ययावत केंद्राची स्थापना केली जात आहे. पुणे जनरल टपाल मुख्य कार्यालयात हे केंद्र स्थापन करण्यात आले असून, गुरुवारी खासदार अनिल शिरोळे यांच्या उपस्थितीत त्याचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र मंडल मुख्य पोस्टमास्तर जनरल एच. सी. अग्रवाल, पुण्याचे पोस्ट मास्तर जनरल गणेश सावळेश्वर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment