नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा
पवना नगर, (वार्ताहर) – पवना धरणातील पाणी साठा 91.50 टक्के झाल्याने सोमवार दि. 24 ला सकाळी 10 पासून पवना जल विद्युत प्रकल्पाद्वारे 1300 क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. आज दिवसभरात 36 मिली मीटर पाऊस झाला. 1 जूनपासून एकूण पाऊस 2039 मिली मीटर पाऊस झाला. आज अखेर धरणात 7.786 टीएमसी साठा आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणाच्या साठ्यात चांगली वाढ झाली. रविवारी सायंकाळी पाचपर्यंत पवना धरणात 85 टक्क्यांहून अधिक साठा झाला होता.
No comments:
Post a Comment