Thursday, 6 July 2017

मेट्रोचा पहिला टप्पा निगडीपर्यंत करा

सिटीझन फोरमची मागणी : संस्था, संघटनांना एकत्र येण्याचे आवाहन
पिंपरी – वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पुणे मेट्रो प्रकल्पाला केंद्र व राज्याने मंजुरी देवून पुणे महामेट्रोने काम सुरुवात केली आहे. परंतु, पहिल्या टप्यात पिंपरी ते स्वारगेट हा मार्ग प्रस्तावित आहे. त्यास केंद्राची तत्वत: मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत असावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमने केली आहे. त्याच्या पाठपुराव्यासाठी शहरातील सामाजिक संस्था, संघटनांना एकत्र येण्याचे आवाहन फोरमच्या वतीने तुषार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले.

No comments:

Post a Comment