Monday, 3 July 2017

“बीआरटी’च्या दिरंगाईचा आकाशचिन्ह परवानाला भुर्दंड?

– सुमारे 5 कोटींचा फटका बसण्याची शक्‍यता 
– बीव्हीजीला जाहिरात क्षेत्र द्यावे लागणार
पिंपरी – बांधा, वापरा व हस्तांतरित (बीओटी) करा, या तत्वानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील निगडी-दापोडी बीआरटी मार्गावरील 16 बस स्थानक भारत विकास ग्रुपने (बीव्हीजी) तयार केली आहेत. मात्र, प्रत्यक्षात बीआरटी सुरु न झाल्याने “बीओटी’चा मोबदला म्हणून बीव्हीजीला जाहिरात क्षेत्र मिळाले नाही. त्याची भरपाई म्हणून “बीव्हीजी’ला पाच वर्षांसाठी 600 चौरस मीटर जाहिरातीचे क्षेत्र द्यावे लागणार असून, त्यामुळे आकाशचिन्ह व परवाना विभागाला 5 कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागण्याची शक्‍यता आहे.

No comments:

Post a Comment