घरात पाळीव प्राणी असावेत की नसावेत, यावरून नेहमीच थोडेफार वाद होत असतात. याबाबत आपला काय विचार आहे. पाळायचे असेल तर काय काळजी घ्यावी, नसेल का नको… कुत्रा-मांजर पाळणे ही काही आताची फॅशन नाही… तर पूर्वापार आपल्याकडे प्राणी पाळण्याची पद्धत आहे. आपल्याकडेच नाही तर अनेक देशांमध्येही ही प्रथा आहे. प्राणी पाळण्याबाबत कोणाचाच विरोध नसतो- विरोध असतो तो बहुधा त्यांची काळजी घेण्याबाबत… आणि सध्याच्या विभक्त कुटुंबपद्धतीत आणि आपण आपल्या घरच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून त्या प्राण्यांची हेळसांड होणार नाही नाही याचाही विचार करायला हवा. याबाबत आपले मत काय आहे ते कळवा, खरे तर ही तुमची आवड आहे. मात्र त्याबाबत तुम्ही काय विचार कराल… कशी सोडवावी ही समस्या… तुम्हीच सांगा…
No comments:
Post a Comment