पुणे - तोंडी तलाक हा घटनाबाह्य ठरविणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने लाखो मुस्लिम महिलांचा विजय झाला असून, त्यांना आता न्याय मिळणार आहे. खरंतर हा निर्णय यापूर्वीच होणे अपेक्षित होते, पण असो. मुस्लिम महिलांच्या हक्कांची जाणीव याद्वारे अधोरेखित झाली आहे. या निर्णयामुळे सर्व समावेशकता आणि सक्षमीकरण या दिशेने मुस्लिम महिलांच्या वाटचालीचा मार्ग सुकर झाला आहे, अशी समाधानकारक भावना विविध स्तरातून व्यक्त होत आहे.

No comments:
Post a Comment