Thursday, 14 September 2017

झीरो पेन्डन्सीमुळे 288 मेट्रिक टन रद्दी!

पुणे - नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये होणाऱ्या दफ्तरदिरंगाईमुळे हेलपाटे मारावे लागत होते. त्यासाठी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये "शून्य प्रलंबिता व निर्गमीकरण'(झीरो पेंडन्सी अँड डिस्पोजल) उपक्रम 1 जूनपासून राबविण्यात आला. या पाच जिल्ह्यांतील 217 कार्यालयांमधून 44 लाख 26 हजार अनावश्‍यक कालबाह्य अभिलेख नष्ट करण्यात आले. तसेच सुमारे 288 मेट्रिक टन रद्दी निघाल्यामुळे सर्व कार्यालये स्वच्छ झाली आहेत, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

No comments:

Post a Comment