Sunday 24 September 2017

शिवसेनेत शहर प्रमुख बदलाच्या हलचाली?

सोमवारी मातोश्रीवर बैठक : उबाळे, आल्हाट, चिंचवडे, भापकर चर्चेत
पिंपरी – आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक तसेच शिवसेनेचे विद्यमान शहर प्रमुख राहुल कलाटे यांचा तीन वर्षांचा कार्यकाल संपत आल्याने शिवसेनेकडून नवीन शहर प्रमुखाची निवड केली जाणार आहे. यासंदर्भात येत्या सोमवारी (दि. 25) मातोश्रीवर बैठक होणार आहे. या पदासाठी शहर महिला संघटक सुलभा उबाळे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, मारुती भापकर, माजी शिक्षण मंडळ सदस्य गजानन चिंचवडे यांचे नाव चर्चेत असून शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उबाळे यांचे नाव आघाडीवर आहे.

No comments:

Post a Comment