रोखठोक न्यूज
पिंपरी : ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान अर्थात ‘आयटी’ (इन्फर्मेशन टेक्नालॉजी) विभागाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. ‘स्मार्ट सिटी’चे सारथ्य महापालिकेचा आयटी विभाग करणार आहे. असे असले तरी महापालिकेच्या आयटी विभागात मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ आहे. या विभागाचा अन्य विभागांशी असलेला समन्वयाचा अभाव आणि या विभागप्रमुखांचा एकांगी कारभार यामुळे आयटी विभागाच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात अनागोंदी आहे. संबंधित विभागप्रमुखांच्या मक्तेदारी पध्दतीच्या कारभारामुळे महापालिकेची वेबसाईट आणि विविध अॅप्स सहज हॅक करता येईल, अशा पध्दतीने त्यांची रचना आहे. या विभागाचा ‘सारथी’ कार्यक्षम आणि तत्पर तसेच पारदर्शी कारभारावर भर देणारा नाही. त्यामुळे ‘स्मार्ट सिटी’च्या अंमलबजावणीत अशा अधिकार्यांच्या अकार्यक्षमतेचा ‘व्हायरस’ निर्माण होणार आहे. त्यामुळे अशा अधिकार्यांना हटवून आयटी विभागाचा ‘सारथी’ बदलण्यात यावा, अशी मागणी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.

No comments:
Post a Comment