शहरातील सार्वजनिक शौचालयांची ठिकाणे गुगल मॅपिंगव्दारे एका क्लिकवर नागरिकांना माहिती उपलब्ध होणार आहे. त्याबाबतचे प्रशिक्षण पालिका कर्मचा-यांना रविवारी (दि. ३) महापालिकेत देण्यात आले.
केंद्र शासनाचे शहरी विकास मंत्रालयाने देशातील निवडक शहरामध्ये सार्वजनिक शौचालये पेट्रोलपंप, मॉल, दवाखाने, रेल्वे स्टेशन, बसस्टँड याचे ठिकाण दर्शविणारे अॅप विकसीत केले आहे. या कामासाठी भारतीय गुणवत्ता परिषद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयामधील आरोग्य निरीक्षक, स्थापत्य आणि झोपडपटटी निर्मुलन व पुर्नवसन विभागातील कनिष्ठ अभियंता अशा एकुण ४८ कर्मचा-यांना भारतीय गुणवत्ता परिषदेचे प्रतिनिधी अखिल कुमार व कुशल श्रीवास्तव यांनी ऍन्डरॉईड मोबाईलच्या सहाय्याने शहरातील सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांचे गुगल मॅपींग करणेबाबत तांत्रिक प्रशिक्षण दिले.
No comments:
Post a Comment