युवा उद्योजक चिन्मय कवी यांचा पालिका आयुक्तांना प्रस्ताव
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका निरनिराळ्या कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिका छापण्यासाठी तब्बल १७ लाख ३५ हजार रुपये खर्च करते. एकीकडे नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारने डिजिटल इंडियाचा नारा दिला जातो. तर त्यांची सत्ता असताना पिंपरी-चिंचवड महापालिका अद्याप जुन्याच निमंत्रण पत्रिका छपाईची पद्धत वापरते. त्यामुळे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना ई-व्हॉट्सअप आणि मोबाइलच्या माध्यमातून आमंत्रण देण्याची प्रथा सुरू करून केंद्राचे डिजिटलचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार करण्याचा प्रस्ताव युवा उद्योजक चिन्मय कवी याने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिला आहे.
No comments:
Post a Comment