Sunday, 17 September 2017

बागेत बनवा पक्ष्यांची जागा

पक्ष्यांना पिण्यासाठी घराच्या अंगणात, गच्चीवर भांड्यांमध्ये पाणी ठेवण्याची पद्धत आपल्याकडे फार जुनी आहे. ही भांडी बहुधा दगडांची असत. आता आधुनिक काळामध्ये या भांड्यांनी अर्थातच नवे रूप धारण केले आहे. पक्ष्यांना अंघोळ करण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी विविध आकारांची आकर्षक भांडी आता मिळू लागली आहेत. घरातील बगीच्यामध्ये किंवा गॅलरीत अशी आकर्षक भांडी ठेवली तर पक्षी बगीच्याकडे आकर्षित होतील. इतकेच नव्हे तर या सजावटीमुळे बागेचा एकूण लूकच बदलेल. बर्डबाथच्या डिझाईनमध्ये अलीकडे जे प्रकार दिसतात त्यामध्ये ग्राऊंड बर्डबाथ हा एक प्रकार आहे. हा अतिशय साधा डिझाईन असलेला प्रकार असून यात मातीचे भांडे जमिनीवर ठेवले जाते. उथळ पसरट भांडे आकर्षक नक्षीने सजवलेले असते. यामध्ये आपण आणखीन वेगळ्या सजावटीचे भांडे ठेऊ शकतो. त्यामध्ये ड्रिपर किंवा कारंज अशी सुविधासुद्धा असते.

No comments:

Post a Comment